World news | अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढलेले लढवय्ये कॉ. जी.एल. अण्णा रेड्डी

गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, कामगार वसाहतींचे नेते

उपसंपादक | दिपक शिरसाठ

स्मृतिवार्ता

मुंबई | २८ ऑगस्ट | रयत समाचार

(World news) आज २८ ऑगस्ट हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील आघाडीचे लढवय्ये आणि मुंबईतील कामगार चळवळींचे कणखर नेते कॉ. जी.एल. तथा गंगाराम लक्षण रेड्डी यांचा स्मृतिदिन. लोक त्यांना अण्णा या नावाने संबोधित असत.

World news

(World news) गोवा मुक्तिसंग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील सहभाग : गोव्याच्या मुक्तिसंग्रामात त्यांनी धाडसी सहभाग नोंदवला होता. दादरा-नगर हवेली ‘लिबरेट’ करणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तुकडीत सामील होत त्यांनी गोव्यामध्ये सत्याग्रह केला. पोर्तुगीज सोल्जरांकडून मारहाण सोसली, तुरुंगवास भोगला. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात ते एक नेते म्हणून पुढे आले. मोरारजी देसाईंच्या दमनशाहीला कडवा प्रतिकार करत महाराष्ट्रातील विविध तुरुंगात कारावास भोगला.

 

(World news) निर्भिड लढवय्ये आणि जनतेचे अण्णा : भिती हा शब्द शब्दकोशात नसलेला निर्भिड लढवय्या म्हणून कॉ. रेड्डी ओळखले जात. संपफोड्यांचा कर्दनकाळ ठरलेले अण्णा पोलिसांशी आंदोलनात समोरासमोर चकमक करीत, तर दुसरीकडे पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच पोलिस मंडळींकडून त्यांना निमंत्रण येई. कार्यकर्त्यांना व जनतेला संघर्षात आणि जेलमध्येही आधार देणारे, स्फूर्ती देणारे ते खरेच जनतेचे अण्णा होते.

 

नगरसेवक, कामगार नेते आणि सामाजिक लढवय्ये : मुंबईतील कामाठीपुरा भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी ‘बेस्ट कमिटी’ आणि ‘गार्डन कमिटी’त भरीव कार्य केल्याचे आजही मुंबईकर सांगतात. मुंबईतील ऐतिहासिक पंचाहत्तर दिवसांच्या विडी कामगार संपाचे नेतृत्व त्यांनी केले. टेलरींग कामगारांची युनियन आणि बेस्ट कामगार युनियनमध्येही ते सक्रिय राहिले. त्यांनी मुंबईतील झोपडपट्टी व भाडेकरूंची संघटना उभी केली. झोपडपट्टीवासियांना फोटोपास मिळवून देणे, बैठ्या चाळीत पाणी आणणे, जुन्या चाळींच्या समस्या सोडवण्यासाठी नेतृत्व करणे अशा असंख्य संघर्षात ते पुढे राहिले.
चळवळीचे इतिहासकार : शिक्षण मॅट्रीकपर्यंत नसतानाही त्यांनी चळवळींचे प्रचंड वाचन, अभ्यास केला. वर्तमानपत्रातील कात्रणे, लेख यांच्या शेकडो फाईल्स घरात संग्रहित होत्या. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील दुर्मिळ छायाचित्रे जतन केलेली. हुतात्मा स्मारक नव्याने बांधताना हुतात्म्यांची नावे लिहिण्यासाठी त्यांच्या या संग्रहाचा उपयोग झाला. त्यामुळे त्यांचे घर म्हणजे एक जिवंत दस्तऐवज केंद्रच होते.
दलित पॅन्थरशी नाळ : कवी नामदेव ढसाळांसोबतची त्यांची लढाऊ मैत्री प्रसिद्ध होती. कामाठीपुरातून ढसाळ नगरसेवक व दुसरीकडे रेड्डी नगरसेवक, या नॅचरल अलायन्समुळे त्यांचे घर पॅन्थर चळवळीचे केंद्र झाले. वरळी दंगल आणि नामांतर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतल्यामुळे त्यांना कारावास भोगावा लागला.
जनतेचा आधार : डॉ. रवी बापट यांच्याशी असलेली मैत्री आणि कार्यकर्त्यांना वैद्यकीय मदतीसाठी नेहमी तत्परता यामुळे ते जनतेसाठी खरे आधार होते. केईएम हॉस्पिटलमधील वॉर्ड क्र.५ चळवळीतील कार्यकर्त्यांचा वॉर्ड बनला होता.
आयुष्य तुरुंगात, घर चळवळीचे केंद्र : त्यांच्या आयुष्याची ९-१० वर्षे तुरुंगात गेली. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ति आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन किंवा मुंबईतील संप, सगळीकडे त्यांचा अटकेचा इतिहास आहे. डिटेन्शनमध्ये असतानाच त्यांनी कॉ. तारा कोर्लेकर यांच्याशी प्रेमविवाह केला. आचार्य अत्रेंच्या शब्दात सांगायचे तर, ‘एक धगधगती आग आणि दुसरा रसरसता निखारा.’
World news
साधेपणा आणि तत्त्वनिष्ठा : आधी त्यांचे कोणत्याही बॅंकेत अकाऊंट नव्हते. गोवा स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळालेल्या पेन्शनसाठीच अकाऊंट उघडले. खेतवाडीतील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चाळीत १०×१६ च्या खोलीत राहून त्यांनी संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी झोकून दिले. नातवांवर मात्र त्यांनी अपार प्रेम केले. त्यांचा धर्म-जात नोंदवताना ‘Indian’ लिहा, हा त्यांचा अभिमान होता. आजही त्यांच्या विचारांचा वसावारसा त्यांचा मुलगा कॉ. प्रकाश व सुन डॉ. अनुराधा रेड्डी जपत कार्यरत आहेत.
अन्यायाविरुद्ध उभा राहणारा आवाज : त्यांच्या आयुष्यातील एक डायलॉग आजही कार्यकर्त्यांना प्रेरणा देतो, अन्याय करणारा एक असो कि पन्नास, समोरासमोर सांगणारे “तुझे स्पेअरपार्ट काढून तुझ्याच हातात देईन ! ” असे हे निर्भीड, साधे पण लढाऊ व्यक्तिमत्त्व असलेले कॉ. जी.एल. रेड्डी अण्णा, जनतेच्या संघर्षाचा आधारस्तंभ. त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र लाल सलाम.World news
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *