World news | ChatGPT वापरात अमेरिका अव्वल, भारत दुसऱ्या क्रमांकावर; व्हायरल आकडे अतिरंजित

उपसंपादक | दिपक शिरसाठ

नवी दिल्ली | २६.१२ | रयत समाचार

(World news) सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ChatGPT वापरासंबंधीच्या इन्फोग्राफिकमध्ये काही आकडे अतिरंजित असल्याचे तथ्य तपासणीत स्पष्ट झाले आहे. SimilarWeb, Semrush आणि DemandSage या आंतरराष्ट्रीय डेटा विश्लेषण संस्थांच्या अंदाजानुसार ChatGPT वापरात अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

(World news) अमेरिकेचा वाटा १५ ते १९ टक्क्यांदरम्यान तर भारताचा ८ ते १३ टक्के इतका असल्याचा अंदाज आहे. ब्राझील, ब्रिटन, इंडोनेशिया, जपान, जर्मनी आणि फ्रान्स हे देश पुढील क्रमांकावर आहेत. उर्वरित ६० टक्क्यांहून अधिक वापर इतर देशांमध्ये विखुरलेला आहे.

(World news) दरम्यान, “२.७ अब्ज वापरकर्ते” किंवा “४६% इतर देश” असा दावा करणारी कोणतीही अधिकृत आकडेवारी OpenAI कडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा ग्राफिक्सकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 

Share This Article