World news | अंबानींसह राणा कपूर यांच्यावर आरोपपत्र दाखल : येस बँकेला हजारो कोटींचा फटका

मुंबई | रयत समाचार

(World news) येस बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत उद्योगपती अनिल अंबानी, येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर, त्यांच्या पत्नी बिंदू कपूर आणि मुली राधा व रोशनी यांच्यासह अनेकांवर आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल २,८०० कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीच्या या प्रकरणात गुरुवारी मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले.

(World news) सीबीआयच्या आरोपानुसार, राणा कपूर यांनी क्रेडिट रेटिंग एजन्सींच्या गंभीर इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून २०१७ मध्ये येस बँकेची मोठी रक्कम अनिल धीरुभाई अंबानी (ADA) समूहाच्या कंपन्यांत गुंतवली. RCFL मध्ये तब्बल २,०४५ कोटी रुपये नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्स आणि कर्जांच्या स्वरूपात गुंतवणूक. RHFL मध्ये जवळपास २,९६५ कोटी रुपये NCDs आणि कमर्शियल पेपर्स स्वरूपात गुंतवणूक

(World news) सीबीआयचा आरोप आहे की, ही गुंतवणूक नंतर multi-layered व्यवहारांद्वारे अन्यत्र वळवण्यात आली, ज्यामुळे येस बँकेला हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागला. या प्रक्रियेत बँकेच्या नियमांचे जाणीवपूर्वक उल्लंघन झाल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे.

त्या काळात CARE Ratings या एजन्सीने ADA समूहाच्या कंपन्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचा इशारा दिला होता. तरीदेखील येस बँकेने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केल्याने गंभीर अनियमिततेचा आरोप आहे.

विशेष न्यायालयाने हे आरोपपत्र स्वीकारले असून पुढील सुनावणी लवकरच निश्चित केली जाणार आहे. यामध्ये आरोपींना आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल. गुन्हेगारी कट आणि बँक फसवणुकीचे आरोप या प्रकरणात लावण्यात आले आहेत.

येस बँक प्रकरणामुळे पुन्हा एकदा बँकिंग क्षेत्रातील कारभार, कर्जवाटप आणि गुंतवणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article