Women | महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य जिथे महिलांसाठी स्वतंत्र धोरण- शरद पवार; ‘यशस्विनी सन्मान’ सोहळा थाटात संपन्न

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

पुणे | २२ जून | प्रतिनिधी

(Women) ‘यशवंतराव चव्हाण केंद्रा’च्या वतीने पुणे येथे ‘यशस्विनी सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना या सोहळ्यात मानाचा ‘यशस्विनी सन्मान’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Women

(Women) शरद पवार यांनी पुरस्कारप्राप्त महिलांचे कौतुक करताना त्यांच्या कार्याची स्तुती केली. यावेळी बोलताना त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या ऐतिहासिक निर्णयांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य होते, जिथे महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले. त्यावेळी राज्याची सूत्रे त्यांच्या हाती होती आणि विविध महिलांसह संवाद साधून हे धोरण आखण्यात आले.

Women

(Women) पवार म्हणाले, वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हिस्सा असावा. या महत्त्वपूर्ण कायद्याची मांडणी करताना अनेक विरोधांना सामोरे जावे लागले, मात्र स्त्रियांच्या हक्कांसाठी आम्ही ठाम राहिलो आणि तो कायदा मंजूर झाला. आजदेखील समाजात बदल आवश्यक आहेत, अनेक कायदे सुधारण्याची गरज आहे.

Women

तसेच, स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दा मांडताना त्यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे उदाहरण दिले आणि सांगितले की, “कर्तृत्व फक्त पुरुषांचं नसतं. स्त्रीलाही तेवढ्याच संधी मिळाल्यास तीही जबाबदारी लीलया पेलू शकते.”
Women
कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर अनेक पुरस्कारप्राप्त महिला व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सभागृह फुलून गेले होते.
‘यशस्विनी विभाग’ गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. महिलांना केवळ सन्मानच नव्हे तर प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हा विभाग सातत्याने करत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *