अहमदाबाद | २० सप्टेंबर | रयत समाचार
(Women) अखिल भारतीय तेरापंथी महिला मंडळाचा प्रतिष्ठित ‘आचार्य तुलसी कर्तव्य पुरस्कार-२०२५’ साठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना जाहीर करण्यात आला. आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या पवित्र सान्निध्यात हा मानाचा सन्मान आज ता.२० सप्टेंबर रोजी प्रेक्षा विश्वभारती, कोबा अहमदाबाद येथे करण्यात येईल, असे सरिता डागा, सूरज बरडीया, नीतू ओस्तवाल यांनी कळविले.
(Women) मूल्याधारित नेतृत्व व महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत हा मान्यवर सन्मानासाठी निवड झाल्याचे विजया रहाटकर यांनी सांगितले.
(Women) निवडीबद्दल अखिल भारतीय तेरापंथी महिला मंडळाच्या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांप्रती रहाटकर यांनी कृतज्ञता व्यक्त करताना पूज्य आचार्य श्री महाश्रमणजींच्या चरणी आभार अर्पण केले.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
