नवीदिल्ली | २२.३ | रयत समाचार
(Women) येथे नियोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांची एकमताने निवड करण्यात आली. संमेलनाच्या निमंत्रक आर. विमला तसेच स्वागताध्यक्ष सुप्रिया देवस्थळी यांनी ही घोषणा केली.
(Women) पुणे येथील सरहद संस्था आणि नवीन महाराष्ट्र सदन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हे दोन दिवसीय संमेलन ता.११ व १२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
(Women) विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंतीचे औचित्य साधून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या माध्यमातून महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक योगदानाला मंच मिळणार असून मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसाराला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
