(Women) स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या RJ Contest 2025 खुल्या गटामध्ये भा.पां. हिवाळे शिक्षणसंस्थेच्या सीएसआरडीतील पत्रकारीता अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांनी मरियम मदस्सर सय्यद यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला.
(Women) या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांना रेडिओ प्रसारणाशी संबंधित संवाद कौशल्य, आवाजातील चढ-उतार (Voice Modulation), विषयाची स्पष्टता आणि सादरीकरण क्षमता दाखवण्याची संधी देण्यात आली होती. मरियमच्या सादरीकरणात प्रभावी संवाद, आत्मविश्वासपूर्ण मांडणी आणि विषयाची शिस्तबद्ध रचना ठळकपणे दिसून आली. याच गुणांच्या जोरावर तिने इतर स्पर्धकांवर सरशी मिळवली.
(Women) या उल्लेखनीय यशाबद्दल मरियमला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार आरजे रुतुजा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
RJ Contest चा उद्देश विविध शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमीतील तरुणांमध्ये माध्यम साक्षरता, संवाद कौशल्य आणि सर्जनशील अभिव्यक्ती विकसित करणे हा आहे. मरियमचे यश तिच्या शैक्षणिक तयारीसह माध्यम क्षेत्रातील आवड, मेहनत आणि चिकाटीचे प्रतीक मानले जात आहे.
मरियमच्या यशाबद्दल सीएसआरडीचे डॉ. सुरेश पठारे, मेहेरनोश मेहता, सॅम्युअल वाघमारे, विणा दिघे, सुधीर लंके, भुषण देशमुख, शिक्षक, सहकारी आणि मित्रमंडळींनी कौतुक केले असून, तिची ही कामगिरी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सहशालेय उपक्रमातील सक्रिय सहभागाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.