women: सफाई कामगारांना राखी बांधून विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन

75 / 100 SEO Score

अहमदनगर | १९ ऑगस्ट | तुषार सोनवणे

येथील चौथे शिवाजी महाराज स्मारकात जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील मराठी विभागाच्या women विद्यार्थ्यांनींनी अहमदनगर महानगरपालिकेतील सफाई कामकारांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. सामाजिक बांधिलकी जोपासत शहरामध्ये स्वच्छतेचे काम करून सर्व नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून एकात्मतेचा संदेश दिला. यावेळी महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापक अशोक साबळे, माजी आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह सुमारे चाळीस कामगार उपस्थित होते.

यावेळी कामगारांच्या वतीने बोलताना गुलाब गाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची दखल घेऊन विद्यार्थिनींनी राख्या बांधल्या, आमच्या कामाची दखल घेतली याबद्दल भगिनींचे आभार. प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या उपक्रमात उपस्थितांचे स्वागत डॉ. नवनाथ येठेकर, प्रास्ताविक प्रा.डॉ.लक्ष्मीकांत येळवंडे तर आभार प्रा.डॉ.मच्छिद्र मालुंजकर यांनी मानले.PSX 20240819 163633

संयोजक म्हणून प्रा.डॉ.वैशाली भालसिंग व प्रा.माधुमिता निळेकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.महेबूब सय्यद व प्रा.नीलेश लंगोटे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मराठी विभागातील अलिशा शेख, वैष्णवी घिगे, प्रतीक्षा जक्कल, क्रांती उघडे, कावेरी हालनोर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *