आंबाजोगाई | प्रतिनिधी
अन्य राज्यातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला आंतरभारती, आंबाजोगाईच्या वतीने स्नेहसंवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. वर्ष २०२४ चा ‘स्नेहसंवर्धन पुरस्कार’ केरळच्या कन्या सिंधू किणिकर-नवगिरे यांना ता. १५ ऑगस्ट रोजी दिला जाणार आहे. मागील वर्षीचे सत्कारव्यक्ती नरपती कुंजेडा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरभारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब व आंतरभारती लातूरचे अध्यक्ष डॉ.बी.आर. पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
अन्य प्रांतीयांचे स्नेहमीलन
स्नेहसंवर्धन पुरस्काराच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी आंबाजोगाईत राहणाऱ्या अन्य प्रांतीयांचे स्नेहमीलन होणार आहे. अन्य प्रांतीय बंधू-भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन शरद लंगे (संयोजक), दत्ता वालेकर (अध्यक्ष), वैजनाथ शेंगुळे (सचिव) तथा कार्यकारिणी व आंतरभारतीच्या आजीव सदस्यांनी केले आहे.
हा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी, सायंकाळी ५ वाजता विलासराव देशमुख सभागृह, न.प. इमारत, आंबाजोगाई येथे होणार आहे. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमासाठी आंतरभारती, आंबाजोगाईची टीम प्रयत्नशील आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.