तलासरी | प्रतिनिधी
(Women) तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील महिलांसाठी पंचायत राज व्यवस्थेतील ७३ व्या घटना दुरुस्तीच्या आधारे महिलांचे हक्क, अधिकार व सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
(Women) कार्यशाळेत भारतीय जनसंसदेचे अध्यक्ष अशोक सब्बन यांनी महिलांना संविधानाने दिलेल्या हक्कांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, महिला सभांना ७३ व्या घटना दुरुस्तीमुळे संविधानिक दर्जा प्राप्त झाला असून महिला सभेतील सर्व ठराव ग्रामसभेत मंजूर करणे बंधनकारक आहे. एखादा ठराव नाकारायचा असल्यास त्यासंदर्भात कायद्यातील कलमासह लेखी कारण द्यावे लागते, अशी महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली.
(Women) ग्रामसभा, महिलासभा, वार्डसभा, मासिक सभा, तसेच शाश्वत विकासाच्या भूमिकेवर त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेतून महिलांच्या सहभागातून खरी लोकशाही व सक्षमीकरणाची प्रक्रिया गतिमान होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
तलासरी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीमधील महिलांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या प्रश्नांना उत्तर देतांना आणि कायद्याविषयीची माहिती देतांना कार्यशाळा माहितीपूर्ण व प्रेरणादायी ठरली.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी