पुणे | रयत समाचार
(Women) बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशनने यावर्षी प्रतिष्ठेचा लाडली मीडिया अँड अॅडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी सलग तिसऱ्यांदा पटकावला आहे. २०२३आणि २०२४ नंतर २०२५ मध्ये एकाच वेळी दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाल्याने संस्थेची हॅटट्रिक पूर्ण झाली, अशी माहिती प्रशांत पवार यांनी दिली.
(Women) यंदा अप्सरा आगा (पुणे) हिला वेब फीचर (मराठी) कॅटेगरीत आणि ऋषिकेश मोरे (छत्रपती संभाजीनगर) यांना फीचर व्हिडिओ (मराठी) कॅटेगरीत पुरस्कार जाहीर झाला.
(Women) अप्सरा आगा हिने सांगली-कोल्हापूर पुरातील अपंग महिलांच्या अनुभवांवर आधारित ‘पाणी कमरेच्या वरपर्यंत आलं अन् अपंग असल्याची पहिल्यांदाच जाणीव झाली‘ या ग्राऊंड रिपोर्टमध्ये हवामान बदलाचा अपंग स्त्रियांवर होणारा परिणाम मांडला होता.
ऋषिकेश मोरेच्या ‘आमची सोनी मॅडम वाघीणेय, वाघीण! अख्खं जंगल सांभाळते‘ या व्हिडिओ स्टोरीत ताडोबा परिसरात कार्यरत महिला वनपाल सोनी पंधारे यांच्या जंगल संरक्षणातील कार्याची नोंद घेतली आहे.
Asar Social Impact Advisors यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ मालिकेअंतर्गत तयार झालेल्या या दोन्ही स्टोरींना पुरस्कार घोषित झाले.
एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने बाईमाणूसने आदिवासी, दलित, मुस्लिम आणि भटक्या-विमुक्त समाजातील तरुणींना डिजिटल पत्रकारितेचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविला आहे. बाईमाणूसच्या महिला पत्रकारांचे काही ग्राऊंड रिपोर्ट्स आता देश-विदेशातील प्रमुख मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित होत आहेत.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
