Sports | नॅशनल स्केटिंगमध्ये महाराष्ट्राचा डंका; टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी पटकावली 6 पदके

पुण्यातील राष्ट्रीय स्पर्धेत नवी मुंबईच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

उपसंपादक | दिपक शिरसाठ

पुणे | १८.०१ | रयत समाचार

( Sports) पुण्यात सुरू असलेल्या RGOI (रुलर गेम ऑफ इंडिया) आयोजित १३व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत नवी मुंबईतील टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी पहिल्याच दिवशी जबरदस्त कामगिरी करत एकूण ६ पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

(Sports) पुणे येथील एलएक्सटी राहुल राणे स्केटिंग बँड ट्रॅकवर १७ व १८ जानेवारी २०२६ रोजी ही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असून देशभरातील नामवंत स्केटर्स यात सहभागी झाले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत टीम एक्स्ट्रीमच्या खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या स्पर्धेत अनन्या माळी हिने २ रौप्य पदके, स्वरूप सोनवणे याने १ रौप्य व १ कांस्य पदक, पृथ्वी भावना राजेश हिने २ कांस्य पदके जिंकत महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. विशेष म्हणजे तिन्ही खेळाडूंनी दुहेरी पथकांमध्ये पदके पटकावत संघाची ताकद दाखवून दिली.

(Sports) या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व प्रशिक्षक करण सरदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. करण सरदार यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील टीम एक्स्ट्रीम स्केटिंग क्लबमध्ये सध्या १०० हून अधिक खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्रातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक स्केटर्स घडविण्याचा निर्धार टीम एक्स्ट्रीम क्लबने केला असून, या यशामुळे भविष्यातील वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.

हे ही वाचा : साप्ताहिक ई- मार्मिक

Public issue | बळजबरीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे गुपीत; सिमेंट कंपन्यांच्या लाभासाठी पब्लिकच्या माथी सिमेंट प्रदूषण

Share This Article