लीड्स | २५ जून | गुरुदत्त वाकदेकर
(Sports) कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडने इतिहास रचत भारतावर पाच विकेट्सनी सनसनाटी विजय मिळवला. डकेटच्या भेदक शतकासह क्रॉली व रूट यांच्या अर्धशतकांच्या बळावर ३७१ धावांचे लक्ष्य सहज पार करत इंग्लंडने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १–० अशी आघाडी घेतली.
(Sports) या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात ४७१ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल ४६५ धावा करत भारताला केवळ ६ धावांची लहानशी आघाडी दिली. दुसऱ्या डावात भारतीय संघ ३६४ धावांवर तंबूत परतला आणि इंग्लंडपुढे ३७१ धावांचे लक्ष्य उभे राहिले.
