sports: सिया अडसुरे सह झिंजुर्डे, बडे यांनी पटकावले सुवर्णपदक; कर्नल परब्स् स्कूलच्या खेळाडूंचे बॉक्सिंगमधे घवघवीत यश; खेळाडूंची रांची स्पर्धेसाठी निवड !

69 / 100 SEO Score

पुणे | २० ऑगस्ट | तुषार सोनवणे

येथे झालेल्या ICSE राज्यस्तरीय sports बॉक्सिंग स्पर्धेत अहमदनगर येथील कर्नल परब्स् स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. यामधे चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत सुवर्णपदकासह अनेक बक्षिसे मिळवली. यामध्ये उत्कृष्ट खेळाडू सिया अडसुरे हिने सुवर्णपदक मिळविले. तिच्यासोबत अर्णव झिंजुर्डे, वेदांत बडे यांनीही सुवर्णपदकाचा मान मिळविला. तर समर परभणे, अबशाम पठाण यांनी रौप्यपदक. आरुष अष्टेकर, ईशान धनवटे यांनी कास्य पदक पटकावले. या स्पर्धेत श्रीराज सुरवसे, आदित्य कर्डिले याचा सहभाग राहिला.

सिया अडसुरे, अर्णव झिंजुर्डे, वेदांत बडे या खेळाडूंची झारखंडमधील रांची येथे होणाऱ्या राष्ट्रीय ICSE बॉक्सिग स्पर्धेत निवड झाली. कर्नल परब्स् स्कूलचे ट्रस्टी गिता परब, डायरेक्टर दिलीप परब, रिकी परब यांच्यासह प्रशिक्षक उस्मान शेख यांचे खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

इयत्ता सातवीतील खेळाडू विद्यार्थीनी सिया अडसुरे ही रयत शिक्षण संस्थेच्या अंबिका विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी अडसुरे आणि इंदू अडसुरे यांची नात असून शैलेंद्र आणि अमिता याची कन्या आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *