अहमदनगर |१७.१२ | रयत समाचार
(Sports) बोल्हेगाव येथील आदेश लॉन येथे आयोजित दुसरी ओपन अहिल्यानगर कैबुकाई कराटे चॅम्पियनशिप २०२५ ही जिल्हास्तरीय स्पर्धा रविवारी ता. १४ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडली. या स्पर्धेत साक्षी अरुण थिटे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले.
(Sports) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेवक योगिराज गाडे, मदन आढाव, शिहान शिरीष तळेकर तसेच बाल कलाकार श्रीशा अकडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबई, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ३०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
(Sports) बक्षीस वितरण समारंभाला माजी नगरसेवक कुमार वाकळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कोमल वाकळे पाटील तसेच रिलस्टार आकाश मुसळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे आयोजन अमित बडदे यांनी केले होते, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मंचरकर यांनी केले.
कार्यक्रमास बोल्हेगाव स्पोर्टस् क्लबचे खेळाडू व पदाधिकारी सागर कोलते, तुषार कोलते, किशोर बामदळे, गणेश कळमकर, अतुल देठे, वैभव आंधळे, काका रोहकले, संदीप कोलते, भाऊ कापडे, पिंटू गायगवाड, सचिन उजागरे, अंबादास शिंदे, डॉ. बाळासाहेब मेने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यशाबद्दल साक्षी अरुण थिटे हिचे सर्वत्र अभिनंदन होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडाप्रेमींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी
