अहमदनगर | १५ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Sports) अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादाच्या चौकशीसाठी राज्य कुस्तीगीर संघाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली. शिवराज राक्षेसह अनेक कुस्तीप्रेमींनी राक्षेवर अन्याय झाल्याचे सांगितले होते. त्याने अपिल केले होते परंतु त्याच्या अपिलाकडे लक्षच दिले नसल्याचे राक्षेचे म्हणणे आहे. अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्यातील कुस्तीच्या निर्णयासंबंधी चौकशी करण्यात येणार.
संबंधित बातमी वाचा : latest news | निकाल 100 टक्के चुकीचा, पंचांचा एक तरी पोरगा आहे का कुस्तीत? – डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे
(Sports) शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तथा कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रा. विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पंच प्रा. दिनेश गुंड (पुणे), सुनिल देशमुख (जळगाव), शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू नामदेव बडरे (सांगली) व राष्ट्रीय खेळाडू विशाल बलकवडे (नाशिक) यांचा समितीत समावेश करण्यात आला.
हे ही वाचा : साहित्यवार्ता | नाथसंप्रदायातील मंत्रतंत्र – टी. एन. परदेशी