समाजसंवाद | १४ एप्रिल | संजय सोनवणी
(Social) “मानवी अधिकार कायद्याने नव्हेत तर समाजाच्या सामाजिक आणि नैतिक अधिष्ठानामुळे संरक्षित होतात. समाजातील लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा पाया असायला हवी…त्याउलट नव्हे.”- डॉ.बाबासाहेब आंबेडकर, (२५ नोव्हेंबर १९४९, घटना समितीसमोर भाषण देतांना.) बाबासाहेबांचे हे विधान भारतीय लोकशाहीच्या संदर्भात अत्यंत महत्वाचे आहे. “समाज आधी…मग राजकारण!” असे बाबासाहेबांनी बजावून सांगितले होते.
(Social) “सामाजिक लोकशाही मजबुत असल्याखेरीज राजकीय लोकशाहीच पाया भक्कम होत नाही!” असेही बाबासाहेब उपरोल्लिखित भाषणात स्पष्टपणे म्हनले होते.
(Social) आपण त्याउलट दिशेने जात राजकारण व राजसत्ता आधी मग समाज या तत्वाकडे आलेलोच आहोत व यात आपण आपल्या सामाजिक पानिपताची बीजे रोवत आहोत याचे भान आपल्याला कधी येणार? आपण लोकशाहीकडे नव्हे तर मध्ययुगीन सरंजामदारशाही व्यवस्थेत आलेलो आहोत. सरंजामदारांत प्रजेबद्दल जी तुच्छता आणि माजोरडेपणा असे त्याची दु:श्चिन्हे आताच्या धर्म आणि अर्थवादी नवसरंजामदारांत हरघडीला दिसत आहेत. अशा स्थितीत परिस्थितीचा कडेलोट एक ना एक दिवस होणार हे भाकित वर्तवायला कोणा ज्योतिष्याची आवश्यकता नाही.
आजचा समाज असामाजिक झाला आहे. लोकशाहीची मुलतत्वे त्याने पायतळी तुडवली आहेत. एकमेकांचे हित पाहण्याऐवजी एकमेकांच्या ताटातील घास पळवण्यात वा तसे कट आखण्यात मग्न आहे. सामाजिक विखारांचा उद्रेक झाला आहे. या विखारापासून सुटका करून घ्यायची असेल तर सामाजिक लोकशाहीचेही तत्व आम्हाला राष्ट्रीय जीवनात अनुसरावे लागेल.
आणि वर्तमानात तर लोकशाहीच्याच गळ्याला नख लावले जात आहे. आम्ही सावध व्हायला हवे.

हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.