शेवगाव | ६ जुलै | लक्ष्मण मडके
(Social) आषाढी एकादशीनिमित्त शेवगाव सायकल असोसिएशनच्या वतीने शेवगाव ते वरूर (धाकटी पंढरी) अशी पर्यावरणपूरक सायकल वारी काढण्यात आली. या निसर्ग वारीतून पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन आणि व्यसनमुक्तीचा महत्वपूर्ण सामाजिक संदेश देण्यात आला.
(Social) वारी दरम्यान “सायकल चालवा – पर्यावरण वाचवा”, “प्रदूषण हटवा”, “अमली पदार्थांचे सेवन टाळा – निरोगी आयुष्य जगा”, “वृक्ष आहेत पर्यावरणाचे खरे आभूषण” अशा जनजागृतीपर घोषवाक्यांनी सुसज्ज फलक घेऊन वारकऱ्यांनी जनजागृती केली. भक्त पुंडलिक मंदिर व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातही विशेष जनजागृती उपक्रम राबवले गेले.

(Social) श्री क्षेत्र वरुर येथे संतोष खडके यांनी सर्व सायकल वारकऱ्यांसाठी पारंपरिक फराळाचे नियोजन केले. गेली चार वर्षे सातत्याने हे कार्य ते करत असून त्यांच्या या सेवाभावी योगदानाबद्दल त्यांचा सायकल असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याचबरोबर, संतोष खडके यांची कन्या अदिती संतोष खडके हिने पांडुरंग माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचाही सन्मान डॉ. योगेश फुंदे व डॉ. कृष्णा देहाडराय यांच्या हस्ते करण्यात आला.
या वारीचे नियोजन अध्यक्ष विनोद ठाणगे, उपाध्यक्ष डॉ. संदीप बोडखे, सचिव कैलास जाधव, खजिनदार वसंतराव सुरवसे यांच्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून करण्यात आले.
वारीत नानासाहेब देशपांडे, सुनील गवळी, डॉ. निखिल काकडे, प्रदीप बोडखे, राघव बोडखे, भारत दहिवाळकर, अवधूत ठाणगे, अंबादास दिवटे, योगेश शिंदे, मयूर रोडी, अनिल दिनकर, प्रणव भोसले, सुभाष पवार मामा, शंकर गरड सर, सानवी फुंदे, स्मिता देशपांडे, सिद्धेश देहाडराय यांसह अनेकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.
या सामाजिक उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, निरोगी जीवनशैली आणि व्यसनमुक्त आयुष्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवण्यात यश मिळाले.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
