(Social) समाजातील न्याय, समानता आणि शांततेच्या मूल्यांवर आधारित कार्य करणाऱ्या ‘सम्यक’ संस्थेला आज अठरा वर्षे पूर्ण झाली असून संस्थेने १९व्या वर्षात प्रवेश केला आहे. ३ ऑक्टोबर २००७ रोजी गांधी जयंतीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी नोंदणीकृत झालेल्या या संस्थेने स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिंगभेद, पुरुषत्व, प्रजनन आरोग्य हक्क, तसेच विकास प्रक्रियेत लक्षणीय योगदान दिले आहे.
(Social) या प्रवासात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्यसेवा पुरवठादार, नागरी समाज संघटना, माध्यम प्रतिनिधी, शैक्षणिक क्षेत्र, तसेच पंचायतराज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींशी दृढ नाते निर्माण केले आहे. हा संपूर्ण प्रवास आमच्या संचालक मंडळ, समुदाय, कर्मचारी, इंटर्न्स, भागीदार, मार्गदर्शक, सहकारी, लेखापरीक्षक, पुरवठादार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आमच्या दात्यांच्या विश्वास आणि सहकार्यामुळे शक्य झाला आहे, असे सम्यकच्या वतीने आनंद पवार यांनी सांगितले.
(Social) आव्हानांना सामोरे जात, कृतज्ञतेने आणि नव्या उत्साहाने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करत सम्यकने १९व्या वर्षाच्या वाटचालीस सुरुवात केली आहे.