पुणे | २३ जून | प्रतिनिधी
(Social) प्रख्यात समाजवादी विचारवंत लोकनेते भाई वैद्य यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना लोकनेते भाई वैद्य युवानेता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भाई वैद्य फाऊंडेशन आणि आरोग्य सेना यांच्या वतीने ता.२२ जून रोजी एस.एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, पुणे येथे हा सन्मान प्रदान करण्यात आला.
(Social) पुरस्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी साहित्य, समाजकार्य, शिक्षण, प्रशासन आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. भाई वैद्य यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
(Social) पुरस्कार स्वीकृतीनंतर पत्रकार राजू परुळेकर आणि डॉ. अभिजीत वैद्य यांनी भाई वैद्य यांच्या विचारांचा व कार्याचा व्यापक परामर्श घेतला. आजच्या सामाजिक, राजकीय स्थितीवर खुमासदार भाष्य करत त्यांनी मूल्याधिष्ठित विचारांची गरज अधोरेखित केली. सध्याची अस्थिर मूल्यव्यवस्था ही कायमची राहणार नसून, परिवर्तन नक्की होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या दिमाखदार आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाई वैद्य फाऊंडेशन आणि आरोग्य सेना यांनी आयोजित केलेला हा सोहळा समाजातील नवविचारांना प्रेरणा देणारा ठरला.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

