सांगली|०१ ऑगस्ट|प्रतिनिधी
(Social) वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकात कॉ. अण्णाभाऊ साठे विचारमंथन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर होते.
(Social) यावेळी डॉ. पाटणकर म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक वाटेगाव येथे काही कोटी रुपये खर्चून उभारले जात आहे. हे स्मारक अण्णाभाऊंच्या कार्याला, त्यांच्या कथा, पोवाडे, गाणी आणि समाजजीवनाला न्याय देणारे असावे, यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांची समिती स्थापन करून शासनाला निवेदन दिले जाईल.
(Social) ते पुढे म्हणाले, अण्णाभाऊंनी फक्त संयुक्त महाराष्ट्रासाठी नव्हे, तर कामगार-कष्टकरी वर्गाच्या लढ्यांत अग्रभागी भूमिका घेतली. त्यांचे साहित्य जागतिक स्तरावर जनमानसात पोहोचले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शाहीर सदाशिव निकम आणि शाहीर रफिक पटेल यांनी अण्णाभाऊ व बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांनी शाहिरी सादर केली.
कार्यक्रमात रवींद्र बर्डे, ॲड. कॉ. सुभाष लांडे, कॉ. अतुल दिघे, अच्युत माने, लक्ष्मण माने, डॉ. शरद गायकवाड, रमा गोरख, कॉ. राम बाहेती, भाई दिगंबर कांबळे आदींनी विचार मांडले. परिषदेत धनाजी गुरव यांनी ठराव मांडला, जो चर्चेनंतर एकमताने मंजूर झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. जयंत निकम यांनी केले, सूत्रसंचालन मिलिंद पाटसुते यांनी, तर आभार योगेश साठे यांनी मानले.
health: मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770