Social | डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद

Social | डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद

अहमदनगर | ०१.९ | रयत समाचार

(Social) मानवी जीवनाला दिशा दाखवणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉ. अभय बंग यांना प्रत्यक्ष ऐकण्याची दुर्मिळ संधी नगरकरांना उपलब्ध होत आहे. ‘जगावं कशासाठी व कसे?’ या विषयावर त्यांचा संवाद रविवारी ता. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हॉटेल संजोग, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

(Social) डॉ. अभय बंग हे सुप्रसिद्ध वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्ते असून SEARCH (Society for Education And Rural Community Health) या संस्थेचे संस्थापक व संचालक आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्यसेवा, महिलांच्या आरोग्यविषयक चळवळी, तसेच समाजमनाला भिडणारे संशोधन यासाठी त्यांचे कार्य जागतिक पातळीवर गाजलेले आहे.

(Social) या संवादाचे आयोजन डॉ. धनंजय वारे (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. महेश जरे (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट) यांनी केले आहे. कार्यक्रमानंतर सर्व सहभागींसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी हृदयरोग विभाग, आरोग्यसदन हॉस्पिटल, सावेडी, अहिल्यानगर किंवा ९६५७६१३६३५, ८८५५०५०४२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले आहे.

हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

Health अहमदनगर आदिवासी आरोग्य जिल्हा महाराष्ट्र सामाजिक