अहमदनगर | २ जुलै | प्रतिनिधी
(Social) अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नाशिक येथे बदली झाल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी खैरे यांना तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
(Social) या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी खैरे साहेबांच्या कार्यशैलीचे कौतुक करताना सांगितले की, “खैरे साहेब हे शांत स्वभावाचे, संवेदनशील अधिकारी असून त्यांनी कर्तव्य बजावत असताना सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेऊन निस्वार्थपणे न्याय दिला. अशा अधिकाऱ्यांची उपस्थिती ही जिल्ह्यासाठी मोठे भाग्यच आहे.”
(Social) या सन्मान सोहळ्याला जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, युवा शहर अध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी खैरे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील, असे मनोगत व्यक्त केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.