
अहमदनगर | १५ एप्रिल | प्रतिनिधी
(Social) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती देशभर नव्हे तर जगभर मोठ्या धुमडाक्यात साजरी झाली. बाबासाहेबांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की जगातील अनेक विद्वानांसह खरे आंबेडकरवादी, बहुजनवादी त्यांना ‘बापाचा’ दर्जा देतात. राज्याप्रमाणे अहमदनगर शहरात विविध उपक्रमांनी जयंती उत्साहात साजरी झाली. मार्केटयार्ड चौकातील पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण या जयंतीला होणे अपेक्षित होते पण मनपा प्रशासनाने भिमसैनिकांचा हिरमोड केला. यावर्षी तेथील मुळच्या अर्धाकृती पुतळ्यास सर्वांनी अभिवादन केले. नवा पुर्णाकृती पुतळा काळ्या कापडाआड झाकून होता.

(Social) सावेडी भागातील प्रेमदान चौक म्हणजे शिवरत्न जिवबा महाले चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी वेगळ्या पध्दतीने साजरी केली जाते. येथे मोठा फ्लेक्स लावला जातो पण त्यावर डॉ.बाबासाहेब यांच्या व्यतिरिक्त कोणाचाच फोटो नसतो. मुळात महापुरुषांच्या फोटोसोबत आपला फोटो लावायची आपले कार्यकर्तृत्व किती आहे? याचा विचार फोटो लावणाराने करावा. महापुरूषांच्या फोटोसोबत फोटो लावला तर त्यांच्या विचाराने १००% काम केले पाहिजे, अशी धारणा येथील कार्यकर्त्यांची आहे.

(Social) चौकात लावलेल्या फ्लेक्सवर माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब यांचा फोटो आणि त्यांनी आपल्याला नक्की काय दिले, याचा सविस्तर माहितीपर फ्लेक्सवर प्रसिद्ध केली होती. हा फ्लेक्स नेता सुभाष चौकातील लोढा हाईट्स बिल्डिंगमधील श्रीकृष्ण डिझाईनर्सचे संचालक महेश राऊत यांनी तयार केला. फ्लेक्सवरील माहिती अनेकजण थांबून वाचत होते. अनेकांनी फ्लेक्स सोबत सेल्फी काढल्या, काहींनी या फ्लेक्सचे व्हिडीओ, रिल्स करून सोशल मिडीयावर प्रसिद्ध केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना त्यांनी सर्व जातीधर्मासाठी जे कार्य केले त्याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाज एकरूप होईल, अशी माहिती संतोष गायकवाड यांनी दिली.
सुरुवातीला संध्या मेढे, भावना गायकवाड यांच्याहस्ते पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी संजय नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब यांच्या पुस्तकांचे वाटप केले तसेच महाप्रसाद म्हणून लापशी वाटप करण्यात आली.
यावेळी आबिद दुल्हेखान, विजय केदारे, दत्ताभाऊ वडवणीकर, तुषार सोनवणे, ईश्वर जायभाय, अजय नितनवरे, रतन गायकवाड, बाबा लोखंडे, बाळासाहेब जायभाय, अंबादास येमूल, शुभम शिंदे, दिगंबर भोसले, संजय नारद, प्रकाश वडवणीकर, मनेश शिंदे, अथर्व साळवे, सुनिल खर्पे, भाऊसाहेब लोखंडे, राजेंद्र टीपरे, रमेश चाबुकस्वार, सुरेश चाबुकस्वार, शेखर धाडगे, किशोर डहाणे, बंडू झिने, सोपान वायभासे, निल बारसे, भाऊसाहेब लोखंडे, विठ्ठल सुरम, भैरवनाथ वाकळे आदींसह चळवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
