१०० संविधान कीर्तन संकल्प
मुंबई | १२ जुलै | प्रतिनिधी
(Religion) जात, धर्म, पंथ याच्या पलिकडे जाऊन माणसामाणसात समता आणि बंधुता निर्माण करणारी शिकवण वारकरी संतांनी समाजाला दिली. ही शिकवण म्हणजेच समतेवर आधारित लोकशाहीची मूळ प्रेरणा असल्याचे प्रतिपादन माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी येथे केले.
(Religion) गिरगावमधील माधवबाग सभागृहात दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या २४ व्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी ‘काल्याचे कीर्तन’ सादर केले.
“याती कुळ माझे गेले हारपोनी, श्रीरंगा वाचोनी अनू नेणे”
(Religion) या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर आधारित कीर्तनातून त्यांनी वारकरी परंपरेतील समतेची शिकवण, सर्वसमावेशकता, लोकशाही मूल्ये आणि बंधुत्व यावर प्रकाश टाकला. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातून सामाजिक संदर्भ उलगडून दाखवले.
