Social: भाऊसाहेब चासकर यांच्यासह सहा जणांना राष्ट्रीय स्तरावरील सर सन्मान पुरस्कार प्रदान; वर्षा ठाकूर, आशिष के भट्टाचार्य, डॉ.इब्राहिम नदाफ, डॉ.कादर शेख, सुजाता लोहोकरे, अमोलराज भोसले यांचा समावेश

69 / 100 SEO Score

सोलापूर | १ सप्टेंबर | प्रतिनिधी

Social राज्याच्या इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान‘ पुरस्कारासाठी सात गुणवंतांची निवड करण्यात आल्याची माहिती फाऊंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धराम माशाळे आणि बाळासाहेब वाघ यांनी दिली होती. सोलापूरमधील सिंहगड शैक्षणिक संस्था येथे शनिवारी सकाळी १० वाजता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.आशिष के. भट्टाचार्य (पुणे), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. इब्राहिम नदाफ (बीड), सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सुजाता लोहोकरे, (कुरकुंभ, पंढरपूर) अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त अमोलराज भोसले व शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर (अकोले, अहमदनगर) यांची ‘सर सन्मान‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सकाळचे संपादक अभय दिवाण, सर फाऊंडेशनचे समन्वयक बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे, महिला समन्वयक हेमा शिंदे, राजकिरण चव्हाण, अनघा जहागीरदार, गुणवंत चव्हाण, विजयकुमार वसंतपुरे, मोतीलाल जाधव, नवनाथ शिंदे, नर्मदा मीठा, सुचिता मदने आदी उपस्थित होते.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *