सोलापूर | ११ .१० | प्रतिनिधी
(Social) माढा तालुक्यातील पूरग्रस्तभागात जीव धोक्यात घालून तब्बल २०० जनावरांचे प्राण वाचवणारे मदन चव्हाण आणि तात्याबा चव्हाण या दोन शूर ‘खऱ्या गोरक्षकांचा’ माढाबार असोशिएशनने शाल, फेटा आणि पुष्पहार देऊन सत्कार केला, अशी माहिती ॲड. तुकाराम राऊत यांनी दिली.
(Social) ॲड. राऊत यांनी सांगितले, पूरस्थितीत गावकऱ्यांची जनावरे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला असताना मदन आणि तात्याबा चव्हाण यांनी विलक्षण धाडस दाखवून त्या सर्व जनावरांना सुरक्षित स्थळी नेले. त्यांच्या या कार्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान टळले.
(Social) सत्कार सोहळ्यात माढाबार संस्थेचे पदाधिकारी, स्थानिक वकील वर्ग तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित सर्वांनी चव्हाण यांचे कौतुक करत त्यांच्या धैर्य आणि मानवतेच्या भावनेचा गौरव केला. कार्यक्रमात भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून समाजातील संकटसमयी एकजुटीचा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या या शूर व्यक्तींमुळे माढा तालुक्याचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे.