स्मृतिवार्ता | १७.१० | रयत समाचार
(Social) नगर तालुक्यातील वारूळवाडी येथील मिरावली बाबा पहाड हे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शिवाजी भानुदास कर्डीले यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल ५ कोटी रुपयांची विकासकामे केली. या कामांमुळे पहाडाचे रूप पालटले. मिरावली बाबा पहाड आणि आमदार कर्डीले यांचे अत्यंत घनिष्ठ ऋणानुबंध होते. ते याच परिसरात रहायला असल्याने लहानपणीपासून येथे येत असत.
(Social) परवा ता. १५ रोजी आमदार कर्डीले यांनी मिरावली दर्गा येथे भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मुजावर बाबा जहागीरदार यांनी पाणीपुरवठा पाईप चोरी आणि कंदुरी खाना येथील बंद पडलेल्या कामाबाबत प्रश्न सांगितला. यावर कर्डीले यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा करून, प्रत्यक्ष भेट देवुन तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
(Social) या सर्व कामांमुळे मिरावली पहाड व परिसरातील धार्मिक स्थळांना नवे स्वरूप लाभले असून, समाजात त्यांच्या कार्याची आजही आठवण केली जाते, अशी माहिती शफी जहागीरदार व रफीक मुन्शी यांनी दिली.
त्यांनी केलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा टाकीसाठी २७ लाख रुपयांचा निधी. भक्त निवास आणि कंदुरी खाना बांधकाम यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये. दर्गाह परिसरात पेव्हिंग ब्लॉक व कब्रस्तान कंपाऊंड भिंत. वारुळवाडी ते मिरावली पहाड डांबरी रस्ता. वारुळवाडी ते पहाड स्ट्रीटलाईट व्यवस्था तसेच दर्गाह परिसरात चार हायमॅक्स लाईट उभारणीची कामे करण्यात आली.
याशिवाय काटवन खंडोबा रस्ता परिसरातील गंजे शहीदा कब्रस्तान येथे २० लाख रुपयांच्या खर्चाने सुशोभीकरण, पेव्हिंग ब्लॉक व मशीद परिसर हायमॅक्स लाईट अशी अनेक कामे पूर्ण झाली. तसेच मशीद परिसराचे सुशोभीकरण हेदेखील त्यांच्या पुढाकारानेच साकारले.
त्यांनी उभारलेली सामाजिक समतेची परंपरा कार्यकर्त्यांसह नगरकरांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
