अहमदनगर | २७.१ | रयत समाचार
(Social) येथील महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या जुनी १७ नंबर शाळा म्हणजेच महात्मा फुले शाळेत २६ जानेवारी निमित्त मिठाईसह पोह्याचे वाटप करण्यात आले. २६ जानेवारी हा संविधान दिवस भारतभर नव्हे तर जगभर साजरा होतो. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या दिवशी जागर होत असतो. झेंडावंदनासाठी सर्व एकत्र होतात. नव्या पिढीला संविधान समजावे, विद्यार्थ्यांमधे भारतीय राज्यघटनेबाबत जागृती व्हावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
(Social) शिवसेनेचे धनंजय गोलवड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपक नेटके, जयंत भिंगारदिवे, सुभाष भिंगारदिवे, अजय नेटके, सौरभ भिंगारदिवे, सागर भिंगारदिवे, मयुर भिंगारदिवे, सोनु बारस्कर, करण गुंजाळ, दत्ता गोलवड, गोरख बनकर आदी माजी विद्यार्थी मंडळींनी विद्यार्थ्यांना मिठाई वितरीत केली. शिक्षकांनी या उपक्रमाविषयी आभार व्यक्त केले.
