कोपरगाव |२१ फेब्रुवारी | किसन पवार
(Social) कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे २ हजार लाभार्थ्यांचे ऑक्टोबर २०२४ पासून अनुदान बंद करण्यात आले आहे सदर लाभार्थ्यांपैकी फक्त ६९० लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड व हयातीचे दाखले संजय गांधी निराधार योजना विभागाकडे जमा केलेले आहेत मात्र १३१० लाभार्थ्यांनी त्यांचे हयातीचे दाखले सादर केलेले नाहीत. अशी माहिती कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत यांनी दिली.
(Social) ते पुढे म्हणाले की उर्वरित १३१० लाभार्थ्यांनी तात्काळ त्यांचे हयातीचे दाखले व आधार कार्ड संजय गांधी विभागात जमा करावे तसेच ज्यांचे अनुदान चालू आहे त्यांनी एप्रिल २०२५ नंतर हयातीचा दाखला जमा करायचा आहे.
२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ज्यांचे हयातीचे दाखले सादर होणार नाही व आधार प्रमाणिकरण होणार नाही त्यांचे अनुदान कायमस्वरूपी बंद करण्यात येईल असे सावंत यांनी सांगितले आहे.
(Social) कोपरगाव तालुक्यात राज्य सरकार मार्फत संजय गांधी, श्रावण बाळ अर्थसहाय्य योजनेत ९३७९ तर केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ विधवा, अपंग लाभार्थी संख्या ८५२ असून त्यांना मासिक पंधराशे रुपये मदत दिली जाते.
केंद्र सरकार निराधाराच्या मदतीच्या योजना राबवताना त्यात राज्य सरकारचा हिस्सा असतोच त्यामुळे हयातीचे दाखले सादर न केल्यामुळे लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून देखील मदत मिळणार नाही.
बँकेमध्ये आधार कार्ड व मोबाईल नंबर बँक खात्या सोबत जोडून केवायसी करून घ्यावी. आता आधार प्रमाणीत झालेल्या बँक खात्यावर हप्ता जमा करणेस सुरुवात करण्यात आली असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.