नाशिक | २९.३ | रयत समाचार
(Rip news) येथील आयटक (AITUC) जिल्हा सचिव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव तसेच कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त कॉम्रेड दत्तु तुपे यांचे आज सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अंत्यविधी आज सायंकाळी ५:३० वाजता मोरवाडी, सिडको येथील अमरधाम येथे होणार आहे.
(Rip news) कॉ. तुपे यांनी विद्यार्थी दशेपासूनच लाल बावट्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. आयुष्यभर त्यांनी कामगार, शेतकरी आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या प्रामाणिक, तडफदार आणि निष्ठावान नेतृत्वामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये आदराचे स्थान मिळवून होते. त्यांच्या निधनाने कामगार चळवळ, डाव्या विचारसरणीची चळवळ आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.
(Rip news) नाशिक जिल्ह्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि आयटक संघटनांमध्ये शोककळा पसरली आहे. विविध स्तरांतील कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
कॉ. राजू देसले, कॉ. मनोहर पगारे, कॉ. तल्हा शेख, कॉ. भीमा पाटील, कॉ. प्राजक्ता कापडणे तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि आयटक नाशिक जिल्हा यांच्या वतीने शोक व्यक्त करण्यात आला.

