Cultural politics | रायगडात जैन भावनांच्या नावाखाली मांस-मच्छी विक्रीवर बंदी

'स्थानिकांच्या आहारस्वातंत्र्यावर घाला; महाराष्ट्रधर्म’वर प्रश्नचिन्ह

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

रायगड | २९.३ | रयत समाचार

(Cultural politics) महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात मांस व मच्छी विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. भारतीय जैन संघटनेच्या मागणीनंतर रोहा नगर परिषदेकडून कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

(Cultural politics) नगर परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचा तसेच जैन धर्मीयांच्या धार्मिक भावना जपण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

(Cultural politics) मात्र, या निर्णयावरून स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, हा निर्णय एकतर्फी असून स्थानिकांच्या आहाराच्या अधिकारावर गदा आणणारा आहे, अशी टीका होत आहे. अनेक नागरिकांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत विरोध दर्शवला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि ‘मराठी एकता संघ, रायगड जिल्हा’ यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. धार्मिक भावना जपण्याच्या नावाखाली इतरांच्या जीवनशैलीवर निर्बंध आणणे योग्य नाही,असे मत संघटनांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे ‘महाराष्ट्रधर्म’ म्हणजेच सहिष्णुता, विविधतेचा आदर आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काळात हा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading