Rip news | पत्रकार सागर दुस्सल यांचे निधन

56 / 100 SEO Score

 

अहमदनगर | १४ जुलै | प्रतिनिधी

आज पहाटेच्या सुमारास पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सागर सुधाकर दुस्सल यांचे अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ते नेहमीच प्रामाणिक वृत्तीने बातमी संकलन व मांडणी करत असत. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि संयमी स्वभावामुळे ते सर्वांच्याच आपुलकीचे बनले होते. त्यांची अंत्ययात्रा प्रेमदान हडको येथून आज सकाळी ११:०० वाजता निघणार आहे. अंत्यसंस्कार अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होतील.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि सहकारी यांच्यासह अनेक मान्यवरांचा मोठा परिवार आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *