नागापूर औद्योगिक वसाहतीतील स्मॉलस्केल कारखानदारांचे नेतृत्व
अहमदनगर | ३ जानेवारी | प्रतिनिधी
(Rip News) येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील स्मॉलस्केल कारखानदारांचे नेतृत्व असलेले अशोक रावजी सोनवणे यांचे काल ता.२ जानेवारी रोजी रात्री ९:३० वाजता निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. फार कष्टातून पुढे आलेले अशोक सोनवणे यांचा अंत्यविधी आज शुक्रवारी ता.३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता अहमदनगर महानगरपालिकेच्या असलेल्या अमरधाम, नालेगाव, अहमदनगर येथे होणार आहे.
(Rip News) अशोक सोनवणे हे नागापूर एमआयडीसी औद्यौगिक वसाहतीतील (SmallScale) लहानलहान उद्योजकांचे नेतृत्व होते. ते आमी (AAMI) चे अनेक वर्षे अध्यक्ष होते. कारखानदारांच्या अनेक ‘उद्योगा‘मधील अडचणींमधे ते सतत मदतीसाठी तत्पर असत तसेच ते प्रथितयश लँड डेव्हलपरसुध्दा होते. त्यांनी शहरहद्दीत अनेक लेआऊट करून लोकांना उपलब्ध करून दिले होते. त्यांचा सावेडी भागातील पद्मावती पेट्रोल पंपामागील लेआऊट ‘प्रसिध्द’ आहे. त्यांनी ऐतिहासिक सिना नदीकडेला ‘निसर्गउद्यान’ होईल अशी अंदाजे १७ गुंठे Open Space जागा नकाशात ठेवलेली आहे. या ‘प्रोजेक्ट’मधे त्यांना तत्कालीन नगररचनाकार संतोष धोंगडे यांचे फार मोठे सहकार्य लाभले.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.