नवी दिल्ली | १२ सप्टेंबर | प्रतिनिधी
Rip Message जगप्रसिध्द जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील संघर्षशील विद्यार्थी नेता ते कम्युनिस्ट खासदार आणि माकपाचे राष्ट्रीय महासचिव पदावर कार्यरत राहिलेले काॅम्रेड सिताराम येचूरी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना न्यूमोनिया झाला होता. नवी दिल्लीत एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. ऍक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते.
भारतीय डाव्या राजकारणात प्रगल्भ विचारवंत अशी ख्याती होती. आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत देखील ओळख निर्माण करणारे सिताराम यांच्या निधनाने डाव्या चळवळीची मोठी हानी झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव होते. १९९२ पासून ते सीपीआय (एम) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. २००५ ते २०१७ अशी १२ वर्षे ते पश्चिम बंगालमधून राज्यसभेवर होते. १९७४ मध्ये ते ते स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सहभागी झाले. त्यानंतर वर्षभरात त्यांनी सीपीआयएममध्ये प्रवेश केला.
काॅम्रेड सिताराम यांच्या समवेत अनेक कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. परभणी येथे अनेकदा त्यांचे भाषण आयोजित केले होते. माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर आल्यावर मोकळेपणाने भारतीय डाव्या चळवळीबद्दल कम्युनिस्ट एकीकरण करण्याबद्दल भाष्य करुन नवी उमेद जागवण्याचा त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे. कम्युनिस्ट चळवळीतील प्रगल्भ तारा हरपला, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे काॅम्रेड राजन क्षीरसागर यांनी दिली.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : human: जातीसंस्थेच्या वास्तवाचा शोध : ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टीम; जातीअंताच्या चळवळीला दिशा देणारा संजय सोनवणी यांचा ग्रंथ
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.