Religion | नागरदेवळे येथे श्री शिव महापुराण कथेचा तिसरा दिवस उत्साहात

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नगर तालुका | ११.२ | रयत समाचार

(Religion) तालुक्यातील नागरदेवळे येथील श्री नागेश्वर देवस्थानमधे चालू असलेल्या श्री शिव महापुराण कथेचा तिसरा दिवस बुधवारी ता. ११ रोजी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ग्रामदेवता श्री नागेश्वर देवस्थान, महाशिवरात्री उत्सव समिती तसेच समस्त ग्रामस्थ नागरदेवळे यांच्या संयुक्त विद्यमाने या कथेचे आयोजन करण्यात आले.

 

(Religion) यावेळी ‘रुद्र संहिता सती पार्वती खंड’ अंतर्गत शिवपार्वती विवाह या विषयावर कथा प्रवचन करण्यात आले. कथाप्रवक्ते वाणीभूषण झी टॉकीज फेम नंदकिशोर महाराज बोधेगावकर (शनी देवस्थान बोधगाव) यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. संतपूजन शिवभक्त ज्ञानदेव भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

(Religion) रात्री ७ ते ९ या वेळेत झालेल्या या कथेला गावासह परिसरातील अनेक भाविकांची उपस्थिती लाभली. शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

 

महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित या शिवमहापुराण कथेचे पुढील दिवसांतही विविध धार्मिक विषयांवर प्रवचन होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading