public issue: ड्रेनेजपाणी रस्त्यावर, पाईपलाईन लिकेजमुळे मैलामिश्रित पाण्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका; प्रशासकाचे दूर्लक्ष

74 / 100 SEO Score

भिंगार | १९ ऑगस्ट | प्रतिनिधी

येथील नागरदेवळे सावतानगर परिसरातील public issue रस्त्यांची दुरावस्था झाल्याने मोठ्या खड्ड्यांमुळे हैराण झालेले नागरिक नरकयातना भोगत आहेत. नागरदेवळे ग्रामपंचायतवर काही वर्षापासून प्रशासकाची नियुक्ती केल्यामुळे अनेक कामे अर्धवट रखडलेली आहेत. रस्त्याच्या मधोमध ड्रेनेजलाईनचे अर्धवट काम झालेले असून मैलामिश्रीत पाणी ओवरफ्लो होऊन अनेक महिन्यापासून रस्त्यावर वाहत आहे. पिण्याच्या पाण्याची लाईन जागोजागी लिकेज असल्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रित होते. नागरिकांनी सांगितले की, पाणी पंपहाऊसहून फिल्टर होऊन आर्मी क्वार्टरला सप्लाय होत आहे. दूषित पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिश्रित होऊन अनेकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, गेल्या अनेक वर्षापासून लाखो लिटर पाणी दररोज वाहत आहेत. अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.PSX 20240819 174538

नागरदेवळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिक पायवाट चालण्यासाठी सुद्धा जागा नाही. सांडपाण्यातून चालावे लागत आहे. नागरिकांनी झालेल्या दुरवस्थेची माहिती ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक यांना वारंवार दिली असून देखील ते महाशय दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराईची शक्यता आहे. खड्ड्यांमध्ये दूषित पाणी साचले आहे तसेच वाहनांमुळे पदचार्‍यावर उडत आहे. यामुळे अनेकदा वाद होतात. पाण्याची दुर्गंधी येत आहे. तसेच नागरिक कचरा येथेच आणून टाकत असल्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. भिंगार शहरात व ग्रामीण भागामध्ये डेंग्यू, मलेरिया अशा गंभीर आजारांची साथ चालू आहे. तरी प्रशासनाने जातीने लक्ष घालून तातडीने प्रश्न सोडविण्याची गरज आहे.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *