वाशिम | २३ मे | प्रतिनिधी
(Public issue) २५ वर्षांपासून वंचित राहिलेल्या पंचशीलनगरमध्ये आता ६०% विकासकामे पूर्ण. सिमेंट रस्ते, नळ पाणीपुरवठा, सौरऊर्जा खांब, मैदाने, पेव्हर ब्लॉक यांसारखी कामे झाली. नगरसेविका कांचन उमेश मोहळे व समाजसेवक उमेश किसन मोहळे यांचे योगदान महत्त्वपूर्ण. शासन योजनांचा प्रभावी वापर आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य.
(Public issue) वाशिम शहरातील पंचशीलनगरचा परिसर तब्बल २५ वर्षे मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करत होता. रस्ते नव्हते, नळपाणी नव्हते, लाईटमीटर नव्हते. जिल्ह्याच्या ठिकाणी राहूनसुद्धा ही वस्ती विकासापासून वेगळी पडली होती. मात्र आज, पंचशीलनगर आपले रूप पालटत आहे.
(Public issue) समाजकार्यकर्ता जितेश कांबळे यांनी रयत समाचारशी बोलताना सांगितले, आज पंचशीलनगरमधील ६०% विकासकामे पूर्ण झाली आहेत. गेल्या सात वर्षात या भागात सिमेंट रस्ते, नळ व्यवस्था, सौरऊर्जा खांब, मैदाने, पेव्हर ब्लॉकसारखी कामे झाली आहेत. ही विकासाची लाट अगदी उशिरा का होईना पण आली, हे महत्त्वाचे आहे.”
कर्तृत्ववान नेतृत्वाची परिणामकारक कामगिरी : या बदलामागे स्थानिक नगरसेविका कांचन उमेश मोहळे व समाजसेवक उमेश किसन मोहळे यांचे मार्गदर्शन व प्रयत्न निर्णायक ठरले आहेत. “त्यांनी वेळोवेळी शासनाच्या विविध योजनांतून निधी आणून पंचशीलनगरच्या गरजा अधोरेखित केल्या आणि कामे प्रत्यक्षात आणली,” असे कांबळे यांनी सांगितले.
त्यांनी खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या सहकार्याने ही कामे मार्गी लावली. जनतेसाठी आवश्यक जे शक्य होते, ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यशैलीत दिसतो.
लोककौतुक आणि अपेक्षांची नोंद : सध्या प्रभागात त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक सुरू असून, “हीच कामाची खरी पोचपावती असते,” असे कांबळे सांगतात. पंचशीलनगरमध्ये अजून काही विकासकामे राहिलेली असून ती लवकरच पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
एकेकाळी उपेक्षित असलेले पंचशीलनगर आता विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा बदल स्थानिक नेतृत्वाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा व जनतेच्या संयमाचा परिपाक आहे. हा विकास केवळ भौतिकच नाही, तर सामाजिक आत्मविश्वासाचाही आहे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.