Public Interest: पालिकेने जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी दुरूस्त करावेत; ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसह महिलांची मागणी 

छायाचित्र - गौरव लष्करे
21 / 100 SEO Score

श्रीगोंदा | गौरव लष्करे

Public Interest शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना लहान मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थीनी व महिलांच्या Activa सारख्या छोट्या चाकांच्या दुचाकींचे खड्ड्यांमुळे नुकसान होत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने काहीजण अक्षरशः धडपडत आहेत. Shrigonda Nagar Palika ने तात्काळ खड्ड्यांची कायमस्वरूपी दुरूस्ती करणे गरजेचे आहे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी वर्गातून होत आहे.PSX 20240717 152819

पारगाव रोड, शनीचौक, जोधपुर मारुती चौक तसेच बाजारतळाच्या दिशेने जाणारा रस्ता या सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पाऊस झाला की हे खड्डे दिसत नाहीत त्यामुळे अपघात होतात. तसेच अहमदनगरकडे जाणाऱ्या वाहनांची रहदारी मोठ्याप्रमाणात असते. परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांनासुद्धा या खड्ड्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाणी वाहनांमुळे शाळकरी मुलांच्या अंगावर उडते त्यामुळे वाहनचालकांसोबत भांडणतंटे होतात.

नागरिकांनी Shirgonda Nagar Palika कडे तक्रारी देखील केलेल्या आहेत मात्र उपाययोजना म्हणून तात्पुरते खड्डे बुजवले जातात, कालांतराने पुन्हा नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेने तातडीने या खड्ड्यांची कायमची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालक, महिला, शालेय विद्यार्थी आणि शहरातील नागरिक करत आहेत.

हे ही वाचा :

Chandbibi Mahal:राष्ट्रीय संरक्षित स्मारक सलाबत खान कबरीवर मोठ्याने स्पिकर वाजवत वाढदिवस साजरा केल्याने ‘डॉन’सह इतरांवर गुन्हा दाखल

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *