महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रलंबित मागण्या विधानसभेत मांडुन त्या सोडविण्यासाठी आ.विक्रम पाचपुते प्रयत्न करणार
श्रीगोंदा | २९ नोव्हेंबर | माधव बनसुडे
Press नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा नगर विधानसभा निवडणुकीत विक्रम पाचपुते यांची मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन आमदार म्हणून निवड झाली. त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने विजयाच्या शिल्पकार प्रतिभाताई (आक्का) व बबनराव (दादा) पाचपुते यांच्यासह फेटा बांधून पुष्पगुच्छ देत अभिनंदन करुन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना आ.विक्रम पाचपुते यांनी सांगितले, पत्रकारांचे विविध प्रलंबित प्रश्न, पत्रकार वसाहतीसह पत्रकार भवनाचा प्रश्न प्राधान्यक्रमाने मार्गी लावणार तसेच Press महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रलंबित मागण्या विधानसभेत मांडुन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष माधव बनसुडे, उपाध्यक्ष मेजर भिमराव उल्हारे, ज्ञानेश्वर येवले, सचिव डॉ.अमोल झेंडे, खजिनदार किशोर मचे, सहसचिव सोहेल शेख, पत्रकार अमर घोडके, डॉ.शिवाजी पवळ, सचिन शिंदे, अनिल तुपे, नितीन रोही, शफिक हावलदार, जावेद इनामदार, दादासाहेब सोनवणे, नंदकुमार कुरुमकर आदींसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Cultural Politics: “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.