सातारा | २१.४ | रयत समाचार
(Press) लेखक, विचारवंत, पत्रकार आणि व्याख्याते राजू परुळेकर यांना प्रतिष्ठेचा ‘फुले-आंबेडकर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक विचारप्रवाहाला धार देणाऱ्या त्यांच्या लेखन आणि वक्तृत्वाचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
(Press) हा पुरस्कार सोहळा येत्या ९ मे २०२६ रोजी साताऱ्यात पार पडणार असून, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते परुळेकर यांचा सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
(Press) या पुरस्काराची घोषणा संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी केली. परुळेकर यांनी पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि प्रबोधनात्मक विचार मांडत महाराष्ट्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या लेखनातून आणि व्याख्यानांतून समाजातील अन्याय, विषमता आणि सत्तेवरील टीका प्रभावीपणे मांडली जाते.
पुरस्कारामध्ये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि शाल असे स्वरूप असून, समाजपरिवर्तनाच्या विचारांना चालना देणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा सन्मान दिला जातो.
या निमित्ताने साताऱ्यातील कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, विचारप्रबोधनाचा एक महत्त्वाचा सोहळा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
