Ipl

Pollution | डीजे- डॉल्बीच्या आवाजाने त्रास? त्वरित पोलिसांना कळवा- डॉ. टिपरसे; पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर; 37 जणांना नोटीसा

SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ६.३ | लहू दळवी

(Pollution) सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आदींना डीजे डॉल्बीच्या कर्कश्य व असह्य अशा आवाजामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाकडून संबंधितांना वारंवार सूचना देण्यात येतात. परंतु या सूचनांकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहर विभाग पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले.

(Pollution) शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल, धार्मिक स्थळे या परिसरामध्ये कर्कश डीजे डॉल्बीचा आवाज करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे कलम  १५ व १९ त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण (विनिमय व नियंत्रण ) अधिनियम २००० मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहर  विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला.

(Pollution) या संदर्भात शहरातील ३७ डीजे/ डॉल्बी चालक- मालक, मंगल कार्यालयांचे मालक, जनरेटर वाहन मालक यांना भारतीय दंड संहिता कलम १६८ प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या असल्याचे देखील डॉ. टिपरसे यांनी सांगितले.

- Advertisement -
Ad image

शहर परिसरामध्ये कोठेही अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करून डीजे व डॉल्बी सिस्टीमद्वारे कर्कश्य व असह्य आवाज करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन डॉ. टिपरसे यांनी केले.

 

Share This Article