कर्जत | ७ एप्रिल | रिजवान शेख
(Politics) कर्जत नगरपंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ नगरसेवक यासह काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी सभापती तथा भाजपाचे नेते आमदार प्रा राम शिंदे यांच्यात गुप्त बैठक संपन्न झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून लवकरच कर्जत नगरपंचायतीत खांदेपालट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सभापती प्रा. राम शिंदेंशी संपर्क साधला असता लवकरच जनतेला याचे उत्तर मिळेल अशी प्रतिक्रिया दिली. अनेक दिवसांपासून कर्जत नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजी उघड उघड दिसत होती हे मात्र निश्चित.
कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एक हाती सत्ता मिळवत भाजपाच्या प्रा. राम शिंदेंच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे १२, काँग्रेसचे ३ आणि विरोधी भाजपाला २ असे जागा मिळाल्या होत्या. यात नगराध्यक्षापदी उषा राऊत तर सहयोगी असणाऱ्या काँग्रेसच्या रोहिणी घुले यांना उपनगराध्यक्षपदी संधी दिली होती. योगायोगाने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. आणि कर्जतकरानी दिलेल्या जनाधारास योग्य साथ मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेस लागली. मात्र ती सपशेल फोलच ठरली. प्रत्येक निवडणुकीत राऊत कुटुंबियांना महत्वाचे पद जाते यावर काही पक्षातील नगरसेवकांचा विरोध होता दिसत होता. मात्र आमदार रोहित पवारांना उघड-उघड विरोध कोणी करायचा यावर एकसंघ होताना दिसत नव्हते. त्यात पाच वर्षे मागील पदाधिकारीच आपल्या पदावर कायम राहतील हा निर्णय पुढे आल्याने अडीच वर्षांनंतर इच्छुक असल्यामध्ये पुन्हा असंतोष उफाळून आला. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार आल्याने पुन्हा प्रा राम शिंदेंना साथ देवून आपले काम मार्गी लावत विकासनिधी मिळवायचा यासाठी रविवारी रामनवमीचे औचित्य साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८ आणि काँग्रेसच्या ३ नगरसेवकांनी सभापती प्रा राम शिंदेंशी गुप्त बैठक घेत कर्जत नगरपंचायतीत खांदेपालट करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. यात यश देखील मिळाले असल्याची भावना एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकांने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
प्रविण घुले ठरले किंगमेकर
राष्ट्रवादी शरद पवार यासह काँग्रेसचे नगरसेवकांच्या यशस्वी बैठकीत भाजपाचे जेष्ठनेते प्रवीण घुले यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली. या सत्ताधारी नगरसेवकांत घुले यांना मानणारा वर्ग आहे. या नगरसेवकांची मोट बांधून त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आले असून तत्पूर्वी केलेल्या फोटोसेशनमध्ये प्रवीण घुले दिसत असल्याने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत फक्त आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेसाठी बसा असे आवाहन कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नगरसेवक सहलीसाठी गेल्याचे समजताच सोमवारी कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत यांनी पत्रकार परिषदेची घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आपला कार्यकाळ हा अडीच वर्षाचा होता परंतु शासनाकडून तो कार्यकाळ वाढवण्यात आला. सन २०२२ मध्ये कर्जत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या कार्यकाळ ठरविण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा आणि उपनगराध्यक्ष यांचा सव्वा वर्षाचा होता परंतु शासनाकडून आमचा कार्यकाळ वाढवण्यात आल्याने अडीच वर्षानंतर काही इच्छुक नगरसेवक होते. त्यांची या पदाकरता महत्त्वाकांक्षा असल्याने आम्ही ठरल्याप्रमाणे राजीनामा देण्यास तयार होतो. उपनगराध्यक्ष पदाचा काळ सव्वा वर्षाचा असल्याने त्यांनी राजीनामा दिला नाही. आमचा कार्यकाळ शासनाकडून वाढविण्यात आला परंतु आम्ही आजही राजीनामा द्यायला तयार आहोत. सर्व नगरसेवकांनी आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चेला बसावे जो निर्णय होईल तो होईल.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक नामदेव राऊत पुढे बोलताना म्हणाले की, नगरपंचायतची निवडणूक आमदार रोहित पवार यांचे नेतृत्वाखाली झाली असून या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मिळून १५ नगरसेवक निवडून आले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष ही दोन्ही नावे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केली होती. तसेच सदर पदांचा कालावधी ही निश्चित करण्यात आला होता यात नगराध्यक्षा यांचा कालावधी अडीच वर्षे तर उपनगराध्यक्ष यांचा कालावधी सव्वा वर्ष निश्चित करण्यात आला होता. उपनगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी सव्वा वर्षात राजीनामा देणे अपेक्षित होते परंतु तसे घडले नाही. तर नगराध्यक्ष उषा राऊत यांचा कालावधी अडीच वर्षाचा होता परंतु शासनाकडून त्याला मुदतवाढ मिळाली. आणि राजीनाम्याची जबाबदारी ही गट नेत्यांकडे देण्यात आली होती. त्यांनी अजेंडा काढून सदरची जबाबदारी पार पाडायला हवी होती. परंतु तसे न करता आमदार रोहित पवार यांच्याशी कुठलीही चर्चा न करता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही राजीनामा द्यायला आजही तयार आहोत त्यांनी येऊन आमदार रोहित पवार यांच्याशी बैठक करावी. असे माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत म्हणाले.
आमदार राम शिंदे आमच्यावर प्रेम व्यक्त करत आहे. असे उपरोधिक विधान नामदेव राऊत यांनी करून सन 2009 ते 2019 पर्यंत आम्ही राम शिंदे यांचे प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी आपल्याला वेळोवेळी वेगवेगळे आश्वासन शब्द दिले परंतु ते शब्द पाळले नाहीत. त्यांनी हे शपथ वाहून सांगावे. परंतु पक्षात असताना फक्त मी घेतलेल्या मेळाव्यामुळे पराभव झाला असे ते म्हणत आहेत. नगरसेवक सहलीवर जाणे हे राम शिंदे फक्त माझ्यावर द्वेषातून हे करीत आहेत. असे राऊत म्हणाले.
मी सभागृहाचा विद्यमान सदस्य आहे..!
नगरपंचायतच्या कारभारात माझं हस्तक्षेप आहे असे ते म्हणत असताना मी स्वतः नगरपंचायतचा एक विद्यमान सदस्य असून मी जर काम करत असेल तर त्याला अडचण काय? या उलट उपनगराध्यक्षा हे कामकाजात कुठलीही जबाबदारी पार पडत नाहीत, असे नामदेव राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.