मुंबई | १९ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) माजी कॅबिनेट मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या आजाराबाबत काही वृत्त वाहिन्यांनी खोडसाळपणाच्या अर्धवट बातम्या प्रसारीत केल्यामुळे मुंडे यांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे दिसून येत आहे.
(Politics) आपल्या आजाराबाबत त्यांनी सांगितले की, आमचे सहकारी, सहकारमंत्री श्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो.
(Politics) ते म्हणाले, श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार.
अधिक माहिती देताना मुंडे म्हणाले, मात्र मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून बेल्स पाल्सी आहे व त्याचा व इतर काही वैद्यकीय बाबींचा त्रास अजूनही होतो असून बोलायला त्रास आहे. मात्र नव्याने मला कोणताही आजार झालेला नाही.
हे ही वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.