संगमनेर | ३० जून | नितीनचंद्र भालेराव
(Politics) जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात संगमनेर व अकोले तालुक्यातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी आज एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कामगार युनियन संगमनेर, वनकामगार संघटना तसेच किसान सभेच्या वतीने संगमनेर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
(Politics) या निवेदनाद्वारे जन सुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हे विधेयक लोकशाहीविरोधी असून जनतेच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारे आहे, असा आरोप संघटनांनी केला. या कायद्याचा वापर आंदोलक, कार्यकर्ते, पत्रकार व नागरिकांना गप्प करण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
(Politics) निवेदन देताना विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी जोरदार घोषणा देत सरकारविरोधी संताप व्यक्त केला. संघटनांनी इशारा दिला की, सरकारने हा कायदा तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
