Politics | समता परिषद जिल्हा आढावा बैठक संपन्न; समता, सामाजिक न्याय आणि संघटन बळकटीकरणासाठी ठरविली दिशा

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | १२ जुलै | प्रतिनिधी

(Politics) अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी व समता सैनिकांची आढावा बैठक नुकतीच शहरातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार समीर भुजबळ होते.

Politics

(Politics) या बैठकीत विविध ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समता सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचाल, समता, सामाजिक न्याय व संघटन बळकटीकरण याविषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्याला अधिक बळ देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

 

(Politics) समीर भुजबळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक समतासैनिकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम केल्यास समाजपरिवर्तन शक्य आहे. संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे, आणि समाजाला संघटित करणे ही काळाची गरज आहे.”

 

बैठकीत सहभागी पदाधिकाऱ्यांकडून संघटनेच्या कार्यपद्धतीसंदर्भात महत्त्वपूर्ण, रचनात्मक आणि मार्गदर्शक सूचना मांडण्यात आल्या. या सूचनांचा सखोल अभ्यास करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस कार्याध्यक्ष बापू भुजबळ, माजी आमदार पांडुरंग अभंग, ॲड. सुभाष राऊत, प्रा. सत्संग मुंडे, समाधान जेजुरकर, डॉ. नागेश गवळी, राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष अमित खामकर, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, फुले ब्रिगेड अध्यक्ष दिपक खेडकर, संजय गारुडकर, प्रसाद भालके, आण्णासाहेब चौधरी, यशवंत पानमळकर, संतोष हजारे, ब्रिजेश ताठे, ऋषी ताठे, अभिषेक चिपाडे, नारायण इवळे, प्रकाश इवळे, जालिंदर बोरुडे, भरत गारुडकर, अनिल निकम, स्वप्नील राऊत, विशाल तांबे, विलास शिंदे, बाळू खताडे, शंकर तुपे, संतोष शिंदे, पप्पू चौधरी, भैय्या चौधरी, अमोल बोरुडे, अजित चिपाडे, अनिकेत चिपाडे, सोनू चिपाडे, भाऊसाहेब चिपाडे, अविनाश शिंदे, योगेश शिंदे, दत्तात्रय शिंदे, तसेच जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही बैठक संघटनेच्या पुढील कार्ययोजनांसाठी दिशादर्शक ठरली असून, सामाजिक समतेचा वसा जोपासण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *