अहमदनगर | ३० ऑगस्ट | रयत समाचार
(Politics) रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक अरुण कडू पाटील यांच्या ७५ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन नगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते माजी खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते अभिष्टचिंतन झाले. सोहळ्याचे अध्यक्षस्थान मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
(Politics) कार्यक्रमात अरुण कडू पाटील यांचा सत्कार करून त्यांना पुढील निरोगी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याच प्रसंगी त्यांच्या संघर्षमय कार्याचा आढावा घेणाऱ्या “संघर्षयात्री” या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
(Politics) कडू कुटुंबाला डाव्या विचारसरणीचा उदात्त वारसा लाभलेला असून, स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कॉ. पी.बी. कडू पाटील, भाऊसाहेब थोरात, डॉ. अण्णासाहेब शिंदे व धर्मा पोखरकर यांसारख्या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला होता. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा प्रभाव वाढत असतानाही या कुटुंबाने ‘डाव्या विचारांचा त्याग न करता पुरोगामी मूल्यांचे जतन’ केले.
या वैचारिक परंपरेचा वारसा पुढे नेत अरुण कडू पाटील यांनी समाजकारण, शिक्षण व सहकार क्षेत्रात लक्षणीय योगदान दिले आहे. पुण्यातील महाविद्यालयीन काळापासूनच त्यांचा समाजवादी विचार दृढ झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली तर शिक्षण व सहकारक्षेत्रात त्यांनी शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या हक्कांसाठी सतत संघर्ष केला.
रयत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षपदी सलग २३ वर्षे अखंड सेवा देणाऱ्या अरुण कडू पाटील यांच्या योगदानाचा गौरव या अभिष्टचिंतन सोहळ्यात करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देणे ही मोठी अभिमानाची बाब असल्याचे ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी सांगितले.
मंचावर रा.स्व.संघाच्या भाजपाचे आमदार दिसत होते तर जिल्ह्यातील डाव्या विचारांच्या मंडळींना न जागा दिल्याने ती दिसत नव्हती.
Cultural Politics | “एकेकाळी ‘लाल’ असलेला अहमदनगर जिल्हा ‘भगवा’ कधी झाला, हे समजलेच नाही” असे म्हणणाऱ्या शरद पवारांचा करिश्मा गेला कुठे ?