(Politics) राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आजपासून प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यांनी MH01 EV 7386 या इलेक्ट्रिक वाहन (EV) वापरण्यास सुरुवात केली असून, याच नव्या वाहनातून त्यांनी आज रामटेक निवासस्थानावरून थेट विधिमंडळात अधिवेशनासाठी प्रस्थान केले.
(Politics) “आधी केले, मग सांगितले” या उक्तीप्रमाणेच पंकजा मुंडे यांनी कृतीतून आदर्श घालून दिला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिल्यास प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, राज्यातील जनतेनेही पर्यावरण रक्षणासाठी आणि स्वच्छ महाराष्ट्रासाठी अशा पर्यायी वाहतूक साधनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
(Politics) दरम्यान, आज सकाळी अधिवेशनाला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या नवीन ईव्ही कारचे विधीवत पूजन केले. यावेळी महिंद्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांना कारची चावी औपचारिकपणे सुपूर्त करण्यात आली.
पंकजा मुंडे यांच्या या पावलामुळे राज्यातील इतर मंत्र्यांना व जनतेलाही पर्यावरणपूरक वाहनांचा विचार करण्यास प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.