नगर तालुका | २९ जून | प्रतिनिधी
(Politics) आदर्शगांव हिवरेबाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर रामदास अमृते यांना शिर्डी येथे ‘बी द चेंज फाउंडेशन’चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थ्यांसाठी नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने ‘बी द चेंज फौंडेशनच्या’वतीने हा पुरस्कार दिला जातो.
(Politics) मुरलीधर अमृते यांनी आपल्या २५ वर्षे सेवेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला होता. शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी राबविलेले उपक्रम, विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेत मिळविलेले सुयश शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार रविवारी ता.२९ रोजी शिर्डी येथे प्रसन्न पोपटराव पवार, मा. ओमप्रकाश दादाप्पा (काका) कोयटे, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष व सर्व विश्वस्त ‘बी द चेंज फाउंडेशन’ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
(Politics) यावेळी अमृते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, शिक्षक म्हणून मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात अधिक उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळा, शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणारा आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. मुरलीधर अमृते यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पदमश्री डॉ. पोपट पवार, सरपंच विमलताई ठाणगे, चेअरमन छबुराव ठाणगे, उपाध्यक्ष रामभाऊ चत्तर, सखाराम पादीर, सहदेव पवार गुरुजी, रोहिदास पादीर, संजय पवार, मंगेश ठाणगे मेजर यांच्यासह सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
