Politics: १०५ घटना दुरुस्तीपैकी काॅंग्रेस राजवटीत ९१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली – विनायक देशमुख

66 / 100 SEO Score

राहुरी | १८ नोव्हेंबर | प्रतिनिधी

Politics राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक महायुतीचे उमेदवार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या प्रचाराची सांगता सभा राहुरी येथे आयोजित करण्यात आली. यावेळी विनायक देशमुख म्हणाले, आतापर्यंत करण्यात आलेल्या १०५ घटना दुरुस्त्यांपैकी काॅंग्रेस राजवटीत ९१ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीने आरक्षण व संविधानाबाबत खोटा प्रचार करुन मतदारांची दिशाभूल केली. देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू असताना आदिवासी व मागास घटकांच्या आरक्षणात कोणताही बदल होणे कदापि शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी पंतप्रधानपदाचा कारभार स्वीकारुन आता सहा महिने होऊन गेले. या कालावधीत मोदी सरकारने संविधानाला कुठेही धक्का लावला नाही.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस (शपा) गट ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असुन आपल्या पोराबाळांचे आणि नातेवाईकांचे हितसंबंध जपणे, त्यांना राजकीय रोजगार निर्माण करुन देणे, यासाठीच हा पक्ष कार्यरत असल्याची टिका देशमुख यांनी केली.

   यावेळी मंचावर उमेदवार शिवाजी कर्डिले, रा.स्व. संघाचे राहुल सोलापुरकर, सुभाष पाटील, ॲड. करपे, राजु शेटे, सत्यजित कदम, धनंजय गाडे, अण्णासाहेब बाचकर यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजी कर्डिले यांना विजयी करावे, असे आवाहन विनायक देशमुख यांनी केले.

हे हि वाचा : Election: मतदान करण्याची ऑनलाईन शपथ घ्या आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळवा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *